नेते राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या टीकेसंदर्भात याचिका दाखल केली होती. एकनाथ शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला विरोध करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, राजकारणात एकमेकांच्या वर्तनावर भाष्य करणे ही राजकारण्यांची नेहमीची पद्धत आहे आणि सार्वजनिक व्यक्तींनी अतिसंवेदनशील असू नये, कारण ते त्यांच्यावरील सर्व टीका पूर्णपणे दाबून टाकतील. शेवाळेंसारख्या राजकारण्यांनी त्यांच्यावर होणारी टीकाही स्विकारायला हवी. एकनाथ शिंदे गटाने 2000 कोटींना शिवसेनेचे चिन्ह विकत घेतल्याचा आरोप करत ठाकरे आणि राऊत यांनी केलेल्या काही विधानांविरोधात शेवाळे यांनी दाखल केलेल्या दाव्याला उत्तर म्हणून हे निवेदन देण्यात आले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यानच्या दुर्घटनेवर राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सल्ला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)