भारतीय सैन्याने मुंबईत कोरोना हॉस्पिटल उभारल्याचा 'तो' मेसेज खोटा असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या मंबई कार्यालयातील जनसंपर्क विभागाने म्हटले आहे. PRO Defence Mumbai द्वारा ट्विटरवर ही माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोशल मिडीयावर संदेश पाहायला मिळतो आहे की, भारतीय सशस्त्र दलाने मुंबईत 1000 खाटांचे कोवीड केअर हॉस्पिटल उभारले आहे. परंतू, असे कोणतेही हॉस्पिटल सैन्याद्वारे उभारण्यात आले नाही. या संदेशाला कोणताही आधार नाही. तसेच हे वृत्त निराधारही आहे.
📍 FAKE NEWS ALERT! 📍
There is a message circulating on social media that a 1000 bedded #COVID19 care hospital by Indian Armed Forces has been established near Airport terminal T1 at #Mumbai. This has no basis and is FAKE news.@PIBMumbai @CMOMaharashtra @mybmc @MahaDGIPR pic.twitter.com/ODumNzLLa1
— PRO Defence Mumbai (@DefPROMumbai) April 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)