आळंदी मधून काल (11 जून) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होण्याच्या वेळेस काही वारकरी आणि पोलिस यांच्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडीयातील काही वायरल व्हिडीओ मध्ये पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान सध्या एका तरूण वारकर्याचा देखील व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने अपाल्यासोबत काय घडलं त्याची आपबिती सांगताना पोलिसांवर गंभीर आरोप देखील केले आहे. एनसीपी नेते अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. Ashadhi Wari Palkhi Sohala 2023: आषाढी वारी पालखी मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 5693 पोलिस कर्मचारी तैनात .
पहा ट्वीट
शिंदे फडवणीस सरकारचा खोटारडेपणा उघड..#वारीहल्ला pic.twitter.com/juBjMbC1TN
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)