Dead Mouse Found in Barbeque Nation Veg Meal: मुंबईतील एका मोठ्या आणि लोकप्रिय रेस्टॉरंटच्या जेवणात मृत उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील वकील राजीव शुक्ला यांनी मुंबईमध्ये बार्बेक्यू नेशन येथून शाकाहारी जेवण मागवले होते. जेव्हा त्यांनी ते अन्न खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना त्यात एक मेलेला उंदीर आढळला. शुक्ला यांनी सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे. अहवालानुसार, 35 वर्षीय शुक्ला पर्यटनासाठी मुंबईत आले होते. त्यांनी 8 जानेवारी रोजी बार्बेक्यू नेशनच्या वरळी आउटलेटवरून रात्रीचे जेवण मागवले होते. या शाकाहारी थाळीची किंमत सुमारे 641 रुपये होती.

शुद्ध शाकाहारी असलेले राजीव शुक्ला यांनी जेवणाच्या पाकिटातून 'दाल मखनी' काढली आणि ती खायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना त्यात एक मेलेला उंदीर दिसला. त्यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाली. नंतर त्यांना बीएमसीच्या बीवायएल नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर तीन दिवसांपेक्षा जास्त काळ उपचार करण्यात आले. शुक्ला यांनी दूषित अन्नाची छायाचित्रे देखील शेअर केली आहेत, ज्यात शाकाहारी जेवणाच्या बॉक्समध्ये मृत उंदीर दिसत आहे. (हेही वाचा: Panipuri Payment Dispute: फुकटखाऊ गुंडांच्या बेदम मारहाणीत पाणीपुरी विक्रेत्याचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)