शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला शिवसेना भवनात सुरुवात झाली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधत आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोक मला काहीतरी बोलायला सांगत आहेत पण मी आधीच सांगितले आहे की ते (बंडखोर आमदार) त्यांना जे करायचे ते करू शकतात, मी त्यांच्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. ते स्वत: निर्णय घेऊ शकतात, परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणीही वापरू नये.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)