सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यभरतात संताप आहे. या संतापाच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीचे नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवार आज या भागात पाहणी करण्यासाठी दाखल झाले. या वेळी त्यांचे कार्यकर्तेही सोबत होते. दरम्यान, स्थानिक भाजप नेते आणि खासादर नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे होते. दोन्ही गट आमनेसामने आल्याने राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरु असल्याने पोलिसांवर मोठा ताण आला. पोलिसांनी दोन्ही बाजूंना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिणामी पोलिसांना अधिकची कुमक मागवावी लागली. जवळपास दोन तास हा राडा सुरु होता. काही काळांने दोन्ही गटाचे नेते एक पाऊल मागे सरले आणि कार्यकर्त्यांची पांगापांग झाली. दरम्यान, राज्याच्या राजकारणात आजचा दिवस या राड्यामुळे जोरदार गाजला.

आदित्या ठाकरे, नारायण राणे आमनेसामने

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)