एखद्या पुरुषाने पर्नल लॉ अंतरग्त दुसऱ्यांदा विवाह केला तरी त्याला पहिली पत्नी सांभाळणे बंधनकारक असणार आहे, असा निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. सत्र न्यायालयाने एका प्रकरणात दिलेला आदेश रद्दबादल ठरवत उच्च न्यायालयाने सोमावारी हा निर्वाळा दिला. सेफाली खातून विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य खटल्यात कोर्टाने पत्नीच्या मासीक भरणपोषणाचा खर्च कमी करत पतीला दिलासा दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निर्णय रद्दबादल ठरवला. एकल-न्यायाधीश न्यायमूर्ती शम्पा दत्त (पॉल) यांनी नमूद केले की याचिकाकर्त्या महिलेचे 12 ऑक्टोबर 2003 रोजी तिच्या पतीशी लग्न झाले होते आणि हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने तिला 12 ऑक्टोबर 2012 रोजी तिच्या वैवाहिक घरातून हाकलून देण्यात आले होते. तिच्या पतीने कथितपणे दुसऱ्या महिलेशी लग्न केले आणि त्यानंतर याचिकाकर्त्या पत्नीला अधिक हुंड्याच्या हव्यासापोटी हाकलून देण्यात आले, असे न्यायालयाने नमूद केले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)