मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दुरदर्शन सह्याद्रीवरील कायक्रर्म मराठीत प्रसारित करावे असे सांगत राज ठाकरें यांनी सह्यादी वाहिनीला पत्र पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ( Sahyadri channel ) हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा - मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंचे हे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांची प्रसारण भवनात भेट घेऊन दिले.
Tweet
मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे हे पत्र पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर, श्री. नितीन सरदेसाई आणि श्री. संजय चित्रे यांनी आज दूरदर्शनचे अप्पर महासंचालक श्री. नीरज अग्रवाल यांची 'प्रसारण भवन' येथे भेट घेऊन दिले आणि यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.#सह्याद्री_वाहिनी #राजभाषा_मराठी
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)