महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सांगली येथील आंदोलनास राज ठाकरे यांनी चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात राज ठाकरे यांनी सन 2013 मध्येच दोषमुक्तीचा अर्ज केला होता. मात्र न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 27 ऑक्टोबर 2021 रोजी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राज ठाकरे यांनी 11 जुलै 2022 रोजी पुन्हा एकदा अर्ज केला. परंतू न्यायालयाने तोही फेटाळून लावला. उलट राज ठाकरे यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट निघाले. त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने राज ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द करत राज ठाकरे यांना दिलासा दिला. तसेच, इस्लामपूर सत्र न्यायालयाला नव्याने सुनावणी घेण्यासही सांगितले. सांगली येथील घटना घडली तेव्हा आपण अटकेत होते. त्यामुळे या आंदोलनाला आपण चिथावणी दिली असे म्हणता येणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)