पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तक्रार अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ममता बॅनर्जी यांनी गेल्या वर्षी केलेल्या मुंबई दौऱ्या दरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप झाला होता. याबद्दल भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार केली होती. दरम्यान, आपल्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत अनेक त्रूटी असून ही तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी मुंबई कोर्टात अर्ज दाखल केला होता. जो न्यायालयाने फेटाळून लावला.
ट्विट
Bombay HC dismissed Mamata Banerjee's application, to quash the complaint for allegedly insulting the national anthem during her visit to Mumbai last year for procedural lapses.
WB CM has sought to quash the complaint filed against her by BJP leader Vivekanand Gupta. pic.twitter.com/A4hyDdM9H9
— ANI (@ANI) March 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)