Shiv Thakare: बिगबॉस  16 फेम शिव ठाकरे यांनी आपल्या घरी बाप्पाचे आगमन केले आहे. शिवच्या घरी गणरायाचे मोठ्या जल्लोषात, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले आहे. विशेष म्हणजे यंदा शिव ठाकरेने पोलिसांच्या हस्ते बाप्पाचं आगमन सोहळा पार पाडला आहे. शिवच्या घरी वर्दीतल्या बाप्पाचे आगमन झाले आहे. शिव ठाकरेने या सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या विशेष पोलिस बाप्पाची चर्चा होत आहे.

 

  काही नेटकऱ्यांनी त्यांना पोलीस वर्दीतल्या बाप्पाचे आगमन केल्या बद्दल ट्रोल करत आहे. एका यूजरने लिहिले की, "देवाची खिल्ली उडवू नये." दुसर्‍याने कमेंट केली, "या लोकांनी देवाला जोकर बनवले आहे."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)