महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर, महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. येत्या काळात महाराष्ट्रात बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेने (यूबीटी) आता महापालिका निवडणुका एकट्याने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की,  त्यांचा पक्ष महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याने लढवणार आहे. प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना राऊत म्हणाले की, 'इंडिया ब्लॉक' आणि 'महा विकास आघाडी'ची युती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आहे.

संजय राऊत म्हणाले की, युतीमध्ये वैयक्तिक पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक विकासात अडथळा येतो. मुंबई, ठाणे, नागपूरसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायतींच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवू. संजय राऊत पुढे म्हणाले की, स्थानिक निवडणुकीत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ. (हेही वाचा: Devendra Fadnavis On Maharashtra Politics: शरद पवार NDA मध्ये सामील होतील का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राजकारणात सर्वकाही शक्य आहे')

उद्धव ठाकरेंची शिवसेना बीएमसी निवडणूक 2025 एकट्याने लढणार-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)