Devendra Fadnavis On Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचे कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या त्या विधानाचे कौतुक केले, ज्यामध्ये पवारांनी आरएसएसची (RSS) प्रशंसा केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) विरोधकांनी पसरवलेल्या खोट्या कथेवर संघ कसा मात करू शकला. यावर शरद पवार यांनी संघाचे कौतुक केले होते.
शरद पवार म्हणजे चाणक्य -
यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत अशी भूमिका मांडली होती की, भाजपला संविधान बदलण्यासाठी आणि आरक्षण संपवण्यासाठी 400 जागा जिंकायच्या आहेत, परंतु विधानसभा निवडणुकीत पक्षाने ते मोडून काढले. शरद पवार यांना हे समजले आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक नियमित राजकीय शक्ती नाही तर एक राष्ट्रवादी शक्ती आहे. कोणत्याही स्पर्धेत इतरांची प्रशंसा करणे चांगले असते. कदाचित म्हणूनच पवारांनी संघाचे कौतुक केले असावे. शरद पवार हे चाणक्य आहेत. (हेही वाचा -Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा होणार मोठी राजकीय उलथापालथ? शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता- Reports)
राजकारणात काहीही होऊ शकते - देवेंद्र फडणवीस
दरम्यान, शरद पवारांचा पक्ष महायुती किंवा एनडीएमध्ये सामील होण्याच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी सांगितले की, जर तुम्ही 2019 ते 2024 पर्यंतच्या घडामोडी पाहिल्या तर मला जाणवले की, काहीही अशक्य नाही. उद्धव ठाकरे दुसऱ्या पक्षात जातात आणि अजित पवार आमच्याकडे येतात. राजकारणात काहीही घडू शकते. त्याचा अर्थ असा नाही की ते घडले पाहिजे. मला वाटत नाही की ते घडणे फार चांगले आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख यांच्या कुटुंबास शरद पवार यांची भेट, उचलली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी)
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमचा शत्रू नाही -
पूर्वी उद्धव ठाकरे आमचे मित्र होते. आता राज ठाकरे मित्र आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमचा शत्रू नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील राजकारणावरील वक्तव्यामुळे शरद पवार एनडीए आघाडीत सामील होणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.