सुप्रीम कोर्टाने आज सर्वात मोठा निर्णय दिला आहे. शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जवळपास चार तास युक्तीवाद झाला. अखेर चार तास चालेल्या जोरदार युक्तीवादानंंतर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी होणारच, असा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या बहुमत चाचणी बाबत निर्णय आल्यानंतर भाजपा आमदारांनी भारत माता की जय चा जयजयकार केला. या निकालानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.
सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या बहुमत चाचणी बाबत निर्णय आल्यानंतर भाजपा आमदारांनी भारत माता की जय चा जयजयकार केला pic.twitter.com/wBpmUBAepP
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)