मुंबई भाजपने मिशन बीएमसी 2022 डोळ्यासमोर ठेऊन रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. भाजप येत्या 20 ऑगस्टपासून मुंबईत बीएमसी निवडणुकीसाठी प्रचार सुरु करण्याची शक्यता आहे. याच तारखेला मुंबई भाजपने एका कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास लक्ष्य 2022 मुंबई ध्येयपूर्ती असे नाव दिले आहे. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आ.ॲड. आशिष शेलार आणि इतर काही मंत्री उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम मुंलुंड येथील : षण्मुखानंद सभागृह येथे शनिवारी ,सकाळी ११ वाजता सुरु होईल.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)