कोल्हापूर मध्ये मीडीयाशी बोलताना संजय राऊतांनी राज्यात विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे असा उल्लेख केला. आता त्यांचं हेच वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. विधानसभेत आशिष शेलार यांनी या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. सत्ताधारी आक्रमक झाले आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्याबाबतचे विधानसभा अध्यक्षांना पत्र देखील दिलं आहे.
पहा ट्वीट
➡️ खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची सत्ताधारी पक्षाची मागणी.
➡️राऊतांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आक्रमक. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३#विधानसभा#mahabudgetsession2023#maharashtrabudget@ShelarAshish@BhatkhalkarA@DDNewslivepic.twitter.com/m6ox4e9Ioz
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 1, 2023
विरोधकांची भूमिका
कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला विधीमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. मात्र या बातमीत तथ्य आहे का? हे देखील तपासले पाहिजे--
विधानसभेतले विरोधीपक्षनेते @AjitPawarSpeaks #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ #विधानसभा#mahabudgetsession2023 pic.twitter.com/iGi3zNpnYO
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)