SSAC परीक्षेत डमी उमेदवारांचा समावेश केल्याप्रकरणी CBI ने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने आयकर विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने महाराष्ट्रातील नागपूर येथील नऊ प्राप्तिकर अधिकार्यांना अटक केली आहे, ज्यांनी कर्मचारी निवड आयोगाने घेतलेल्या अनिवार्य परीक्षेला उपस्थित न राहता विभागात रुजू झाल्याची माहिती मंगळवारी एका अधिकाऱ्याने दिली. हे प्रकरण एसएससी अर्थात कर्मचारी निवड आयोगाने 2012-14 मध्ये घेतलेल्या परीक्षेशी संबंधित आहे. हेही वाचा Nitesh Rane On Love Jihad: हिंदू भगिनींकडे पाहिले तर त्यांचे डोळे काढून संग्रहालयात ठेवू, लव्ह जिहादवरुन नितेश राणेंचे वक्तव्य
Maharashtra | Nine officials of the Income-Tax Department, Nagpur have been arrested for making dummy candidates appear for the Staff Selection Commission examination on their behalf in the year 2012-14: Anti-Corruption Branch, CBI
— ANI (@ANI) December 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)