अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल (Andheri Bypoll Result 2022) आज (6 नोव्हेंबर) जाहीर होत आहे. त्यासाठी मतमोजणीही सुरु झाली आहे. दरम्यान, या मतमोजणीची अद्ययावत माहिती अपण लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे पाहू शकता. त्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करु शकता. ज्यामुळे आपण अंधेरी पोटनिवडणूक निकालाबाबत जाणून घेऊ शकता. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

अंधेरी पोटनिवडणूक निकाल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा आणि ABP MAZA वर पहा Live streaming.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदारांनी म्हणावा तसा उत्साह दाखवला नव्हता. त्यामुळे मतदानाचा टक्काही विशेष समाधानकारक पाहायला मिळाला नाही. या निवडणुकीसाठी एकूण 31.74 टक्के इतकेच नगण्य मतदान झाले. या निवडणुकीत मुख्य प्रवाहातील कोणत्याच राजकीय पक्षाने उमेदवार रिंगणात उतरवला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित मानले जात आहे. तरीही निवडणुकीच्या रिंगणात काहीही घडू शकते. त्यामुळे मतमोजणी पूर्ण झाल्यावर येणाऱ्या निकालाबाबत उत्सुकता कायम आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)