मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई मध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. तेथेच त्यांनी अध्यादेश सुपूर्द केला आहे. त्यांना ज्यूस पाजत उपोषण संपवलं आहे. दरम्यान त्याआधी दोघांनी वाशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. जरांगे पाटीलांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. आजही नवी मुंबईच्या वाशीमध्ये अनेक जणांनी इमारतींवर चढून आनंद व्यक्त केला आहे. Maratha Reservation Protest Called Off: मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश; मागण्या मान्य.

पहा ट्वीट

मनोज जरांगे यांची भेट..

🗓️ 27-01-2024📍वाशी https://t.co/ykt1SLNV3H

— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 27, 2024

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)