Maratha Reservation Protest Called Off: मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश; मागण्या मान्य, थोड्याच वेळात उपोषण सोडणार
Maratha Aarakshan | Twitter

महाराष्ट्र सरकार कडून सर्व स्तरांवर टिकणारं मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंबईत लाखो कार्यकर्त्यांसह उपोषण करण्याची घोषणा केली होती. दरम्यान अंतरवाली सराटी ते मुंबई असा प्रवास करणार्‍या मनोज जरांगेंचा ताफा नवी मुंबई मध्येच रोखण्यात अखेर सरकारला यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सार्‍या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याचा जीआर काल रात्रीच देण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदींचं प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं. तसंच त्यांच्या परिवारांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावं ही त्यांची प्रमुख मागणी मान्य झाली आहे. याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसांत देणार आहे. वंशावळी जोडण्यासाठी शासन निर्णय झाला असून त्यासाठी तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. यासाठी 1884 सालच्या मराठ्यांचा गॅझेटचा विचार केला जाणार असल्याची माहिती आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया 

मराठा समाजाचा जल्लोष 

सर्व मराठवाड्यातील कुणबी आहेत, असा उल्लेख असलेलं 1884 चं एक गॅझेट आहे. त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी शिंदे समिती प्रयत्न करणार आहे. ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला लागू करण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आगामी अधिवेशनात याबाबत कायद्यात रुपांतर केलं जाणार आहे. पुढच्या सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. अशीही माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे. Maratha Aarakshan: मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; सर्वपक्षीय मराठा आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी .

दरम्यान आता नवी मुंबई मधूनच मनोज जरांगे पाटील मुंबईला माघारी फिरणार आहेत. राज्यभर मराठा बांधवांनी या निर्णयानंतर जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली आहे.