'अंबिका मसाले' च्या चेअरमन कमलताई परदेशी यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज (2 जानेवारी) 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. कमलताई यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कमल ताईंचा प्रवास हा शेत मजूर ते यशस्वी उद्योजिका असा झाला होता. बचत गटांच्या महिलांना घेऊन त्यांनी 'अंबिका मसाला' देशा-परदेशात पोहचवला होता. आदर्श उद्योजिका सह अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले होते.
अंबिका मसाल्याच्या प्रवर्तक कमल परदेशी यांचं निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासhttps://t.co/bU4wzkmc7r #ambikamasala #kamalpardeshi
— ABP माझा (@abpmajhatv) January 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)