Anshuman Gaekwad Dies: भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड हे बऱ्याच दिवसांपासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते आणि त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. आता एकेकाळी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या जीवघेण्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणारा हा दिग्गज फलंदाज जीवनाची लढाई हरला. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी अंशुमन गायकवाड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

साधारण 1970-80 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेल्या अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार सुरू होते. माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी बीसीसीआयकडे गायकवाड यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. यानंतर 14 जुलै रोजी बीसीसीआयने गायकवाड यांच्या उपचारासाठी 1 कोटी रुपयांची घोषणा केली होती. गायकवाड यांनी 1974 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. त्यांनी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. 1975 आणि 1979 च्या वर्ल्ड कपमध्येही ते टीम इंडियाचा भाग होते. 1997 ते 1999 आणि पुन्हा 2000 मध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. (हेही वाचा: Virat Kohli: श्रीलंकेत ड्रेसिंग रुम समोर कोहलीला चोकली-चोकली चिडवले; विराट संतापला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)