Ajit Gavhane Resigns: पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गव्हाणे यांनी हा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठवला आहे. अजित गव्हाणे यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील दोन माजी नगरसेवकांनीही आपले राजीनामे सुनील तटकरे यांच्याकडे सुप्र्त केले आहेत. अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर आणि युवक अध्यक्ष यश साने यांनी राजीनामे दिले आहेत. अशाप्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाला मोठा झटका बसला आहे. या चार आजी-माजी नगरसेवकांसह अधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, 20 जुलै रोजी पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. शरद पवारांनी अजित पवारांना दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रवेशाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. (हेही वाचा: Sudhir Mungantiwar Gets Clean Cheat: महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा; वृक्ष लागवड घोटाळ्यात मिळाली क्लीन चीट)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)