Sudhir Mungantiwar Gets Clean Cheat: महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वृक्षलागवडीच्या घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. वृक्ष लागवड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार किंवा गैरप्रकार आढळून आलेला नसल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे मंत्र्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यावर, महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेत भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. महाविकास आघाडी सरकारने यावर आक्षेप घेत अनेक आरोप केले होते. ज्यासाठी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात, वृक्षलागवड मोहिमेत कोणतीही अनियमितता किंवा गडबड झाली नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच राज्यात मोहीम यशस्वी झाल्याचे समितीने स्पष्ट केले. त्यानंतर आर सुधीर मुनगंटीवार यांच्यावरील सर्व आरोप पुसले गेले आहेत. (हेही वाचा: CIDCO Launches Sale Plots And Shops: सिडकोने नवी मुंबईत सुरु केली 48 भूखंड आणि 218 दुकानांची विक्री; जाणून घ्या कुठे कराल नोंदणी)
पहा पोस्ट-
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवड योजनेतील घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल चौकशी समितीकडून सादर करण्यात आला आहे.#news #SudhirMungantiwar #DevendraFadnavis #forest #planting pic.twitter.com/jhumspsNSq
— SaamTV News (@saamTVnews) July 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)