आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडली. या वेळी जाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार राघव चढ्ढा, दिल्लीचे मंत्री आतिशी आणि पक्षाचे इतरही अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे देखील भाजपविरोधी आघाडीत सहभागी होतात का याबातब उत्सुकता आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)