जपानमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या दशकाच्या तुलनेत रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजच्या म्हणण्यानुसार, मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाच्या रुग्णांची साप्ताहिक सरासरी संख्या 12 जानेवारीपर्यंत 1.11 वर पोहोचली, जी मागील आठवड्याच्या तुलनेत 0.34 ने वाढली. गेल्या दशकातील ही उच्चांकी सरासरी आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा मुलांमध्ये एक सामान्य संसर्ग आहे. यात ताप, थकवा, डोकेदुखी आणि सतत खोकला अशी लक्षणे आढळतात.
...