Guillain–Barré Syndrome: पुण्यात गेल्या सात दिवसांत गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची किमान 22 संशयित प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या रुग्णांचे रक्त, मल, घशातील स्वॅब, लाळ आणि लघवीचे नमुने विश्लेषणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV) कडे पाठवण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अधिकाऱ्याने ही माहिती दिली. रुग्णांची वाढती प्रकरणे पाहता पुणे महानगरपालिकेने गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या प्रसाराबाबत अलर्ट जारी केला आहे. नोंदवलेले रूग्ण प्रामुख्याने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलमधील आहेत. रूग्णांना हातपाय कमकुवत होणे किंवा अर्धांगवायू, अतिसार आणि दूषित अन्न किंवा पाण्यामुळे ओटीपोटात दुखणे यांसारखी लक्षणे जाणवत आहेत.
आरोग्य अधिकाऱ्यांनी जनतेला खात्री दिली आहे की हा आजार धोकादायक नाही आणि संसर्गजन्य नाही. हा आजार, बहुतेकदा इतर आजारांच्या दुय्यम स्वरूपात असतो व तो प्रामुख्याने 12 ते 30 वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करतो. यासाठी कोणत्याही विशेष उपचारांची आवश्यकता नाही आणि नियमित वैद्यकीय सेवा पुरेशी आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: Non-Alcoholic Fatty Liver Clinic: मुंबईमधील KEM Hospital मध्ये 28 जानेवारीपासून सुरु होणार नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर क्लिनिक; Amitabh Bachchan असणार ब्रँड ॲम्बेसेडर)
पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची 22 संशयित प्रकरणे-
The Pune Municipal Corporation has issued an alert regarding the spread of Guillain-Barré Syndrome (GBS) after 22 suspected cases were reported across multiple hospitals in the city. Health authorities have assured the public that the disease is not dangerous and is not… pic.twitter.com/gWOlHZbw34
— Pune Mirror (@ThePuneMirror) January 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)