India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी 2025 रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन येथे खेळला जाईल. 21 जानेवारी (मंगळवार) रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) पहिल्या टी20 सामन्यापूर्वी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी लोकप्रिय कालीघाट मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक मंदिरात उभे राहून प्रार्थना करताना दिसत आहेत तर एक पुजारी त्यांच्या कपाळावर 'टिळक' लावत आहे. गौतम गंभीरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधील निराशा मागे सोडून नवी सुरुवात करायची आहे.
पाहा व्हिडिओ -
VIDEO | Team India head coach Gautam Gambhir (@GautamGambhir) offers prayers at Kalighat Temple, #Kolkata.
India will play against England in the first match of the T20 series at Eden Gardens, Kolkata, tomorrow. Beginning with the Eden T20I, the two teams will fight it out in a… pic.twitter.com/frPanegCyJ
— Press Trust of India (@PTI_News) January 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)