23 जानेवारी पासून अयोध्येच्या राम मंदिराची दारं भाविकांना खुली झाल्यानंतर तेथे दर्शनाला रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. यामध्ये आता भाविकांच्या सोयीसाठी 1 फेब्रुवारीपासून Ministry of Civil Aviation कडून 8 नव्या विमानसेवा सेवेत दाखल केल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई सह दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, जयपूर, पटना, दरभंगा, बेंगलूरू या शहरातून विमानसेवा सुरू होत आहे. यामध्ये मुंबई अयोध्या विमान दररोज सकाळी 8.20 चे आहे. ते 10.40 ला अयोद्धेला पोहचणार आहे. तर अयोध्येमधून विमान 11.15 ला मुंबईकडे झेपावेल आणि 13.20 वाजता पोहचणार आहे. Paytm Cashback Offer For Ayodhya Travelllers: अयोध्येला विमान, बस प्रवास करणार्‍यांसाठी पेटीएम ची बंपर ऑफर; पहा 100% कॅशबॅक कुणाला मिळणार? 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)