Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

अयोध्येमधील श्रीरामाचं मंदिर (Ayodhya Ram Mandir) भाविकांना खुलं पासून तेथे भाविकांची रीघ लागली आहे. येत्या काही काळामध्ये पर्यटकांचा तेथे मोठा ओढा दिसू शकतो. अशातच आता पेटीएम (Paytm) कडून बस आणि फ्लाईट च्या माध्यमातून अयोध्येमध्ये येणार्‍यांना खास कॅशबॅक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. पेटीएम कडून या सुविधा देण्यामागचा उद्देश अयोद्धेचा प्रवास भाविकांसाठी सुकर व्हावा असा आहे. 23 जानेवारीला भाविकांना मंदिर खुलं झाल्यापासूनच भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं आहे. सध्या गर्दी आणि उत्तर भारतामधील थंडी पाहता भाविकांनी थोडं सबुरीने घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रवाशांना अगदी 100% पर्यंत कॅशबॅक त्यांच्या बस किंवा विमान प्रवासात मिळण्याची शक्यता आहे. मग आता ही कॅशबॅक ऑफर कशी मिळवायची हे देखील जाणून घ्या.

प्रवाशांना 'BUSAYODHYA'हा प्रोमो कोड बस प्रवासासाठी तर 'FLYAYODHYA' हा प्रोमो कोड विमान प्रवासासाठी वापरायचा आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक दहावा ग्राहक हा कॅशबॅक साठी पात्र असणार आहे. बस प्रवाशांना एक हजार रूपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. तर फ्लाईटने प्रवास करणार्‍यांना 5 हजार रूपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

पहा ट्वीट

प्रवाशांना जर त्यांनी त्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल केला तर ‘Free Cancellation’चा देखील पर्याय दिला जाणार आहे. त्यांना कोणतेही कारण न विचारता त्यांच्या अकाऊंट मध्ये 100% रिफंडचा पर्याय असणार आहे. पेटीएम कडून बस प्रवास करणार्‍यांना त्यांच्या मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत बसचं रिअल टाईम लोकेशन देखील शेअर करता येणार आहे. Ayodhya Ram Mandir Aarti Passes: अयोद्धा राम मंदिरात ऑनलाईन, ऑफलाईन आरती पास देण्यास सुरूवात; इथे पहा दर्शन, आरतीच्या वेळा आणि पास कसा मिळवाल? 

गेल्या आठवड्यात पेटीएमने जाहीर केले की त्याचे ॲप श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, अयोध्या येथे योगदान देण्यासाठी वापरले जाऊ शकते. ट्रस्टसाठीचे योगदान पेटीएम ॲपवर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी लाइव्ह झाले, ज्यामुळे युजर्स आता डिजिटल योगदान करू शकतात. पेटीएम ॲपवरील 'Devotion' विभागातून भाविक दान देऊ शकतात.