10-Year-Old Boy Raped by 3 Minors: मुंबईमधून एका अल्पवयीन मुलावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या घाटकोपर येथे शेजारी राहणाऱ्या 10 वर्षांच्या मुलावर तीन मुलांनी बलात्कार केला आहे. जेव्हा पिडीत मुलाला बसण्यास त्रास होऊ लागला तेव्हा ही घटना उघडकीस आली. मुलाला खुर्चीत बसायला त्रास होत असल्याचे शेजारील एका महिलेच्या लक्षात आले व तिने याची माहिती पिडीत मुलाच्या पालकांना दिली. जेव्हा पालकांनी मुलाकडे विचारणा केली, तेव्हा त्याने सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर घाबरलेल्या आणि संतप्त झालेल्या पालकांनी पंत नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या शाळेतील तीन मुले, जी त्याच्या शेजारी राहतात, त्यांनी या पिडीत मुलाला घरी आणले, जिथे त्यांनी त्याच्यावर बलात्कार केला. हा प्रकार जवळजवळ एक महिन्यापासून सुरु होता.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित मुलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी घाटकोपर येथील 12, 15 आणि 16 वर्षे वयोगटातील तीन मुलांना ताब्यात घेतले. एफआयआरमध्ये, या तिघांवर 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांसह आरोप लावण्यात आले आहेत. डोंगरी कोर्टात त्यांना प्रत्येकी 4,000 रुपयांचा रोख जामीन देण्यात आला आणि कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्यामुळे समुपदेशनाचे आश्वासन देऊन त्यांना घरी पाठवले. (हेही वाचा: Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडमध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या, आरोपीला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)