Crime (PC- File Image)

पिंपरी चिंचवड शहरात पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंबळी येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  राहुल सुदाम गाडेकर असं हत्या झालेल्या 36 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी राहुल सुदाम गाडेकर यांच्या हत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिस पथकाने त्याची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर आणि भारतीय सैन्य दलातील प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे आणि त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.  (हेही वाचा - Mumbai Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक)

राहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया गाडेकर हिने कोरोना काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव पांगा या ठिकाणी एक लॅब सुरू केली होती. ही लॅब चालवत असतानाच तिचे सुरेश मोटाभाऊ पाटोळे या भारतीय सैन्य दलातील जवानाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले.  यानंतर सुप्रियाने तिच्या प्रियकर सुरेश पाटोळे आणि सुरेश पाटोळे यांचा मित्र रोहिदास सोनवणे यांच्या मदतीने स्वतःच्या पतीचा खून करण्याचा कट रचला.

राहुल गाडेकर याचा खून करण्यासाठी सुरेश पाटोळे सुट्टीवर असताना संगमनेर तालुक्यातील चिचपुर या गावी दोन लोखंडी हातोडे विकत घेतले होते. राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयाच टर्म इन्शुरन्स काढला होता, याची जाणीव राहुलची पत्नी आणि तिच्या प्रियकराला होती. त्यामुळे राहुल गाडेकरचा मृत्यू झाल्यानंतर सुप्रिया त्याची वेबनाचे अर्धे पैसे सुरेश पाटोळे आणि रोहिदास गाडगे यांना देणार होती.    राहुल गाडेकर हा आपल्या चाकण येथील कंपनीवर कामाला जात असताना पाठीमागून त्याच्यावर लोखंडी हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.