Expedia Layoffs: गेल्या काही वर्षांत, अनेक टेक कंपन्यांमधील हजारो कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. आता पुन्हा एकदा, यूएस स्थित ट्रॅव्हल टेक कंपनी एक्स्पेडिया ट्रॅव्हल ग्रुपने नोकरी कपातीची घोषणा केली आहे. कंपनी जागतिक स्तरावर सुमारे 1,500 लोकांना कामावरून काढणार आहे. कंपनीने खुलासा केला आहे की, त्यांनी पुनर्रचना योजना सुरू केल्या आहेत, ज्यात त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणीय घट समाविष्ट आहे. कंपनीने आज काही प्रभावित कर्मचाऱ्यांना या बदलांबद्दल सूचित करण्यास सुरुवात केली. नोकर कपात हा एका व्यापक पुनर्रचना धोरणाचा भाग आहे. एक्सपीडियाने कोणत्या लोकांना किंवा विभागांवर कपातीचा परिणाम होईल याबद्दल विशिष्ट तपशील दिलेला नाही, परंतु हे पाऊल प्रवासी उद्योगासमोरील आव्हाने अधोरेखित करते. कंपनीने आपले कार्य सुरळीत करणे आणि जागतिक व्यासपीठावर कार्यक्षमता सुधारणे हे उद्दिष्ट असल्याने पुनर्रचनाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी, एक्सपेडिया ट्रॅव्हलने नोकर कपातीच्या पहिल्या फेरीत (फेब्रुवारी 2023) सुमारे 12% म्हणजेच 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये 100 लोकांना कमी केले. (हेही वाचा: Madhya Pradesh Shocker: नोकरी जाण्याच्या भीतीने Paytm कर्मचाऱ्याची आत्महत्या; गेल्या अनेक दिवसांपासून होता तणावाखाली)
Expedia Group Layoffs 2024: US-Based Travel Technology Company To Lay Off 1,500 Employees, About 9% of Workforce Due to Slow Travel Demand #Layoffs #Travel #Employees #Workforce #Expedia #Layoffs2024 https://t.co/OooXv0R0Be
— LatestLY (@latestly) February 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)