पॅरिस फॅशन वीकमध्ये जिवंत फुलपाखरांचा पोशाख परिधान केलेल्या मॉडेलने रॅम्प वॉक केल्यानंतर, काही दिवसांनि अशाच प्रकारची दुसरी घटना समोर आली. नुकतेच असे एक प्रकरण भारतातील चेन्नई येथून उघडकीस आले आहे, जिथे एक महिला जिवंत माशांसह तिचा जलपरी शैलीचा ड्रेस फ्लॉंट करताना दिसली. पोशाखाला एक लहान भांड्यासारखी रचना जोडली होती, ज्यामध्ये जिवंत मासे होते.

हे प्रकरण समोर आल्यानंतर, एखाद्या शोसाठी जिवंत प्राण्यांचा वापर करण्याच्या आणि त्यांना केवळ प्रॉप्स मानण्याच्या कल्पनेचा नेटिझन्सनी निषेध केला. लोकांनी प्राण्यांवर अत्याचार आणि क्रूरतेच्या घटनांविरुद्ध आवाज उठवला आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने म्हटले की, ‘हे पूर्णपणे घृणास्पद आहे, फॅशनसाठी प्राण्यांचा वापर करणे थांबवा’. दुसरीकडे उर्फी जावेदने या ड्रेसवर प्रतिक्रिया देत तिला हा पोशाख आवडला असल्याचे तिने सांगितले आहे. (हेही वाचा: Man Ate Manchurian In Bengaluru Metro: तरुणाने बेंगळुरू मेट्रोमध्ये खाल्लं 'कोबी मंचुरियन'; पुढे काय झालं? तुम्हीचं पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ganesh GurunG (@ganeshgurung_page)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)