Happy Diwali 2023: President Droupadi Murmu, CM Eknath Shinde, Sharad Pawar यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा!
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरात धन धान्य राहो म्हणून पूजा केली जाते.
दीपोत्सवामधील दिवाळीचा आज महत्त्वाचा दिवस आहे. नरक चतुर्दशीचा दिवशी आज देशभर हिंदू बांधव दिवाळीचा सण साजरा करत आहेत. वसूबारस ते भाऊबीज असा 5-6 दिवस दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या निमित्ताने घराघरात दिवाळीच्या दिवशी दिव्यांची रोषणाई केली जाते. गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरात धन धान्य राहो म्हणून पूजा केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवाळीच्या शुभेच्छा संदेश शेअर केले आहेत. PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा .
पहा ट्वीट
President Droupadi Murmu extends greetings on the occasion of #Diwali pic.twitter.com/94PGtS4a6W
— ANI (@ANI) November 12, 2023
नकारात्मकतेचा नाश होऊन आपल्या आयुष्यातील सकारात्मक विचारांना गती मिळो. ही दिवाळी यश, कीर्तीचा आलेख उंचवणारी, प्रगतीच्या दिशा दैदिप्यमान करणारी ठरो. सर्वांना दीपावलीच्या व लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/Uob5LFnXSa
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 12, 2023
उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी, सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी... लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा...
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.#दिवाळी #दिवाळी_२०२३ #दीपावली #दीपावली_२०२३ #Diwali #Diwali2023 #शुभ_दीपावली pic.twitter.com/h7mhDuUbhP
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2023 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

