Garba In UNESCO's List of Intangible Cultural Heritag: भारतासाठी एक अभिमानाची बाब समोर आली आहे. गुजरातच्या गरबा नृत्याचा समावेश युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की ही प्रतिष्ठित मान्यता मिळविणारा हा भारताचा 15 वा वारसा आहे. रेड्डी यांच्यामते गरबा उत्सव ही भौगोलिक सीमा ओलांडून भक्ती, लैंगिक समावेशकता आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेली परंपरा आहे.
ते पुढे म्हणाले, देशातील या 15 वारसांची ही यादी आपली समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वारसा जगाला दाखवण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारच्या अथक प्रयत्नांची साक्ष आहे. याआधी पश्चिम बंगालच्या दुर्गापूजेचा संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक संस्था UNESCO ने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक यादीत समावेश करण्याची घोषणा केली होती. यासह आतापर्यंत युनेस्कोने भारतातील 38 स्मारकांना जागतिक वारसा दर्जा दिला आहे. (हेही वाचा: Garba Dance: युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारताकडून गुजरातच्या 'गरबा' नृत्याला नामांकन; लवकरच 'गणेशोत्सव' होऊ शकतो सामील)
Congratulations India 🇮🇳
A moment of profound national pride as 'Garba of Gujarat' is inscribed in UNESCO's Representative List of Intangible Cultural Heritage (ICH) of Humanity. This marks the 15th ICH element from India to achieve this prestigious recognition.
Garba, a… pic.twitter.com/AyBV4Bg2dk
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) December 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)