Ramcharitmanas and Panchatantra: राम चरित मानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकन यांचा 'युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर'मध्ये समावेश करण्यात आला आहे. हा समावेश भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, जो देशाचा समृद्ध साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक वारशाची पुष्टी करतो. या साहित्यकृतींचा सन्मान करून, फक्त त्यांच्या लेखकांच्या सर्जनशील प्रतिभेलाच आदरांजली वाहिली गेली असे नाही, तर त्यांचे प्रगल्भ शहाणपण आणि शिकवणी भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देतील, त्यांचे प्रबोधन करत राहतील याचीही खात्री दिली गेली आहे.

'रामचरितमानस', 'पंचतंत्र' आणि 'सहृदयलोक-लोकन' या उत्कृष्ट कलाकृती आहेत ज्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीवर खोलवर प्रभाव टाकला आहे. या साहित्यकृतींनी भारतातील आणि बाहेरील वाचकांवर आणि कलाकारांवर अमिट छाप सोडली आहे. 'सहृदयलोक-लोकन', 'पंचतंत्र' आणि 'रामचरितमानस' हे अनुक्रमे आचार्य आनंदवर्धन, विष्णू शर्मा आणि गोस्वामी तुलसीदास यांनी रचले होते. (हेही वाचा: Char Dham Yatra 2024: वैदिक मंत्रोच्चारांमध्ये बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; पारंपारिक संगीत-नृत्य, भगवान विष्णूच्या जय घोषात भाविक मंत्रमुग्ध)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)