चिंचपोकळीच्या चिंतामणी यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचं 103 वं वर्ष साजरं करत आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा अन्य सार्वजनिक मंडळांप्रमाणे चिंचपोकळीच्या चिंतामणी देखील मोठ्या थाटामाटात विराजमान होण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवार 27 ऑगस्ट दिवशी दुपारी 2 वाजल्यापासून या आगमन सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तरूणाई या आगमन सोहळ्यासाठी विशेष उत्साहीत असते. पण ज्यांना थेट या सोहळ्यात सहभागी होण्यास जमणार नाही त्यांच्यासाठी खास लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय आहे. त्याच्याद्वारा घरबसल्या भाविकांना दर्शन होणार आहे.

कुठे पाहू शकाल  चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा 2022

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)