मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनीही वडीलांच्या पावलावर पाऊल ठेऊन स्वराज्याचा रथ पुढे कायम ठवला. अशा या संभाजी राजांनी 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक केला.आज तोच दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजांना अभिवादन केले आहे.
महापराक्रमी,मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार अभिवादन! pic.twitter.com/dwHyX8NeEF
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 16, 2022
ट्विट
महापराक्रमी, शौर्याचे महामेरू, विद्वान, कुशल राज्यकर्ते, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा!#SambhajiMaharaj #राज्याभिषेक_दिन pic.twitter.com/GIn6BslXtd
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 16, 2022
ट्विट
महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी #छत्रपतीसंभाजीमहाराज यांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या #राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे. pic.twitter.com/rozXUXRRoC
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 16, 2022
ट्विट
शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या अखंड स्वराज्याचा कारभार अगदी समर्थपणे सांभाळणारे, समोर मृत्यू दिसत असतानाही शत्रूला शरण न जाता बलिदानाचा इतिहास रचणारे थोर छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा व तमाम रयतेला राज्याभिषेक सोहळा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/aVBmL92VMp
— R Vikhe Patil (@RVikhePatil) January 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)