Artistic Gymnastics Google Doodle: पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू झाले आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताला देशाचे पहिले पदकही मिळाले. अशात टेक कंपनी मेटादेखील ‘गुगल’द्वारे खास पद्धतीने ही ऑलिम्पिक स्पर्धा साजरी करत आहे. ऑलिम्पिक सुरू झाल्यापासून गुगल दररोज एक नवीन डूडल जारी करत आहे. आजचे डूडल हे जिम्नॅस्टिक या खेळाला समर्पित आहे. या गुगल डूडलवर क्लिक करताच तुम्हाला कलात्मक जिम्नॅस्टिक्स ऑलिंपिक ज्याला इंग्रजीमध्ये Artistic Gymnastics Olympics म्हणतात, या खेळाची सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर मिळेल. तुम्ही कलात्मक जिम्नॅस्टिक्सबाबत डूडलसह खेळांचे निकाल, पदके, हायलाइट्स आणि वेळापत्रक तपासू शकता. (हेही वाचा: International Tiger Day 2024: वाघांच्या संवर्धनाबाबत आज जगभरात साजरा होत आहे 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन'; भारतामध्ये मात्र गेल्या पाच वर्षांत तब्बल 628 प्राण्यांचा मृत्यू)
कलात्मक जिम्नॅस्टिक्स हा सर्वात जुन्या खेळांपैकी एक आहे आणि आधुनिक ऑलिंपिकचा एक भाग आहे. सुरुवातीपासूनच प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कलात्मक जिम्नॅस्टिकचा समावेश करण्यात आला आहे. आता गुगलने आपल्या खास डूडलद्वारे हा खेळ साजारा केला आहे. गुगलने या डूडलमध्ये पक्षी आणि मांजर दाखवले आहे. निळा पक्षी कलात्मक जिम्नॅस्ट बनला आहे, तर मांजर खेळासाठी गुण देताना दिसत आहे.
पहा फोटो-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)