West Bengal: उसाचा रस काढण्याच्या यंत्रात एका व्यक्तीची बोटे चिरडली गेली आहेत. या घटनेच्या  व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्या माणसाचा हात   स्पष्टपणे अडकल्याचे आणि त्याच्या हातातून रक्त निघत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.   प्रेसरमध्ये अडकलेला हात काढण्यासाठी  आजूबाजूचे लोक त्याच हात काढण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये  हातातूनही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रेसरमधून माणसाची बोटे सोडण्यासाठी मशीन उघडण्यात आली. नंतर, त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)