Dog Dies By Car Run Over: उत्तर प्रदेशात गाझियाबाद परिसरात एका पाळीव कुत्र्यावर कार चढवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक तरुण (पग जातीचा) कुत्रा घेऊन रस्त्यावर फिरत असतो. दरम्यान तो फोनमध्ये व्यस्त होताच, समोरून एसयूव्ही कार येते आणि कार थेट कुत्र्याच्या अंगावर चढवते. यात तो गंभीर  जखमी होतो आणि त्याचा मृत्यू होतो. इंदिरापुरमच्या नीती खंड 1 येथील शिवशक्ती गलीमध्ये ही घटना घडली. मृत्यू झाल्यानंतर कुत्र्याच्या मालकाने इंदिरापुरम पोलिस स्टेशनमध्ये एसयूव्हीच्या चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस या घटनेअंतर्गत तपास करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)