Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशातील शामली येथील नगरपरिषद सभेत सदस्यांची मारामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओला समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी राज्ययातील भारतीय जनता पक्षाची खिल्ली उडवली. शामली नगरपरिषदेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नगराध्यक्ष अरविंद सांगल आणि आमदार प्रसन्न चौधरी उपस्थित असताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. नगरपरिषदेतील चार कोटींच्या विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या या बैठकीत काही वेळातच परिषदेच्या दोन सदस्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि मारामारी झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)