ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात शनिवारी संतप्त जमावाने गांजाच्या तस्करीमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याच्या आरोपावरून पोलिस स्टेशन पेटवून दिले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही घटना फिरिंगिया पोलीस ठाण्यात घडली असून या घटनेत काही पोलीस जखमी झाले आहेत. अधिका-याने सांगितले की काही स्थानिक लोक पोलीस ठाण्यात आले आणि काही पोलीस अंमली पदार्थांच्या विक्रीत गुंतले असल्याचा आरोप करत ते पेटवून दिले. दक्षिण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सत्यब्रत भोई म्हणाले की, आंदोलकांनी पोलीस ठाण्यातील फर्निचर लुटले आणि अनेक कागदपत्रे पेटवून दिली. त्याचवेळी अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, आंदोलकांनी रस्ता अडवणाऱ्या लोकांना समजावण्यासाठी गेलेल्या काही पोलिसांशीही झटापट केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)