कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यासाठी बेंगळुरूच्या शांगरी ला हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाने एकमताने काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्णयावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार हे दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुरुवातीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पक्षाचे नेते जितेंद्र सिंग आणि दीपक बाबरिया यांची कर्नाटकातील सीएलपी नेत्याच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. हेही वाचा Wrestlers Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी व्यक्त केल्या वेदना; म्हणाले, 22 दिवस झाले, तरी सरकारकडून बोलायला अजूनही कोणी आले नाही

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)