Independence Day 2023: सक्रिय दहशतवादी जाविद मट्टूचा भाऊ रईस मट्टू रविवारी उत्तर काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यातील त्याच्या घरी तिरंगा फडकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस अगोदर आलेला हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि 'X' (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखला जाणारा) वर व्हायरल झाला. रईस मट्टूचा भाऊ जाविद हा हिजबुल मुझादीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवादी आहे. दहशतवादी जाविद पाकिस्तानात लपून काम करत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. वृत्तानुसार तो दशकभरापूर्वी पाकिस्तानात पळून गेला होता. जाविदचा भाऊ रईस मट्टू याने त्याच्या सोपोर येथील घरी राष्ट्रध्वज फडकवतानाचा व्हिडिओ वृत्तवाहिन्यांनी दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)