पंजाबमधील कोटकपुरा येथे बुधवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील देवीवाला रोड येथील प्रभाग क्रमांक 8 मध्ये घराचे छत कोसळून एका दाम्पत्याचा आणि त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. यासोबतच शेजारची एक 15 वर्षीय मुलगीदेखील जखमी झाली. मृत महिला सात महिन्यांची गर्भवती होती. माहितीनुसार, वाला गुरप्रीत सिंग मंगळवारी रात्री पत्नी कर्मजीत कौर आणि चार वर्षांचा मुलगा गवीसोबत घरी आपल्या घरी झोपले होते. शेजाऱ्यांची 15 वर्षीय मुलगी मनीषाही त्यांच्या घरात झोपली होती. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक खोलीचे छत पडले. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी मोठ्या कष्टाने सर्वांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. परंतु गुरप्रीत सिंग, कर्मजीत कौर आणि गवी यांचा मृत्यू झाला तर मनीषावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा: Poverty Reduction in India: गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत भारतामधील 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले; UN ने केले कौतुक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)