Delhi School Bus Caught Fire: दिल्लीतील द्वारका येथे एका खासगी शाळेच्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही बस शाळेच्या आवारात उभी असताना ही आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत बस जळून खाक झाली.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)