महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न असताना एकनाथ शिंदे गट विरूद्ध उद्धव ठाकरे गट असा संघर्ष 'दसरा' मेळाव्यामध्येही दिसणार आहे. आज शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून दुसरा टीझर जारी झाला आहे. त्यामध्ये पाठीत वार करणार्यांचा कोथळा काढल्याशिवाय राहू नका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा दाखला देत गद्दारांवर तुटून पडण्यासाठी ते सज्ज असल्याचं टीझर मधून जारी केले आहे.
पहा शिवसेना मेळावा टीझर 2022
एक नेता, एक झेंडा, एक मैदान...
एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/xqM6444BbG
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) October 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)