CM Eknath Shinde On INDIA Alliance Mega Rally : शिवाजी पार्कवर इंडीया आघाडीची ( INDIA Alliance ) मेगा रॅली पार पडत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रीया देत, "शिवसेनेसाठी आजचा दिवस काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. कारण, शिवाजी पार्कमधून बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केले. त्याच उद्यानात ही रॅली होत असून, जे वीर सावरकरांविरोधात बोलले आणि त्यांच्यावर आरोप केले. त्यांच्या मांडीला माडी लावून ठाकरे बसणे हे दुर्दैवी आहे... आगामी निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल...' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंजे म्हणाले. (हेही वाचा: Cm Eknath Shinde: एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर; Mood of The Nation सर्वेत केवळ 1.9 टक्के लोकांची पसंती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)